
कोकण विभागातील मृत्यूदर कमीकरण्यासाठी प्रयत्न करावेत -विभागीय आयुक्त आण्णासाहेब मिसाळ
नवी मुंबई, दि.08 : कोविड-19 च्या आजाराने कोकण विभागातीलमृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजनाकरावी. असे आदेश आज कोकण विभागीय महसूलआयुक्त श्री.आण्णासाहेब मिसाळ यांनी दिले. राज्यातील ज्या महानगरपालिकेत सॅम्पलपॉझिटिव्ह रेटियो जास्त आहे. अशा ठिकाणी तपासणीच्या संख्या मोठया प्रमाणावरवाढविण्यात यावेत. जेणेकरून आजाराचे निदान होऊन मृत्यूदर कमी होईल. तसेच सद्यस्थितीरुग्ण संख्या विचारात घेऊन एक महिन्यातील वाढ विचारात घेता उपचार सुविधा म्हणजेआयसीयु, ऑक्सीजन सुविधा देण्यात याव्यात अशा सूचना विभागीय महसूल आयुक्त यांनी यावेळीदिल्या. या शिवाय वादळात झालेल्या नुकसान भरपाईचे वाटप, सातबारा, संगणीकरण, ई-फेरफार याबाबतउर्वरित कामे तात्काळ करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्री.आण्णासाहेब मिसाळ यांनी दिले.यावेळी कोकण विभागातील जिल्हाधिकारी ते तहसिलदारपर्यंतची टेलिफोन डिरेक्टरीचे प्रकाशन विभागीय आयुक्त श्री.आण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपायुक्त (महसूल) श्री.सिध्दाराम सालीमठ, उपायुक्त (सामान्य) श्री.मनोजरानडे, उपायुक्त (करमणूक) श्रीमती सोनाली मुळे, उपायुक्त (पुनर्वसन) श्री.पंकजदेवरे, उपायुक्त (विकास) श्री.गिरीष भालेराव आदि उपस्थित होते.
www.konkantody.com