
भूकंपग्रस्त दाखला वितरण प्रक्रियेत सुधारणा करा
रत्नागिरी कराड: विश्वास मोहिते यांची मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इ-मेल मागणी भूकंपग्रस्त दाखला वितरण करण्याबाबतच्या राज्य शासनाचा निर्णय आणि वितरणाबाबतची कार्यप्रणाली पाहता काही वंचित भूकंपग्रस्तही दाखल्यापासून वंचित राहत असल्याने भूकंपग्रस्त दाखला विधान वितरण करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज असून प्रत्येक भूकंपग्रस्तांना लाभ मिळण्यासाठी तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी भूकंपग्रस्त दाखला वितरण सुधारणा करावी अशी मागणी आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये 1967 साली महाभयंकर असा भूकंप झाला होता. या भूकंपावेळी महाराष्ट्र राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये लोकांचे अतोनात नुकसान झाले होते. या भूकंपा वेळी महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्याबरोबरच सातारा जिल्ह्यालाही या भूकंपाचा मोठा फटका बसला होता. राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे सातारा जिल्ह्यालाही भूकंपग्रस्त असणाऱ्या लोकांना मदत मिळाली होती. भूकंपग्रस्त असणाऱ्या लोकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळावं यासाठी राज्य शासनाने भूकंपग्रस्त दाखला वितरणासाठी स्वतंत्र शासन निर्णय करून त्याची अंमलबजावणी केली. त्या भूकंपग्रस्त दाखल्यामुळे बऱ्याच कुटुंबांना नोकरीमध्ये लाभ घेता आला.
परंतु दाखला वितरण प्रक्रियेतील आणि शासन निर्णय यातील काही क्लिष्ट बाबी मुळे भूकंपग्रस्त असतानाही भूकंपग्रस्त दाखला किंवा त्यापासून मिळणारे लाभ घेता आले नाहीत आणि काही भूकंपग्रस्त कुटुंबे भूकंप ग्रस्त असतानाही यापासून वंचित राहिले यामुळे भूकंपग्रस्त दाखल्याच्या वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्याचबरोबर जुना शासन निर्णय बदलून त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्यावेळी पात्र भूकंपग्रस्त ना त्याचा लाभ मिळेल. भूकंपग्रस्त दाखला वितरण करताना असलेल्या शासन निर्णयाप्रमाणे भूकंपग्रस्तांना मिळालेल्या मदतीच्या यादीमध्ये नोंद असलेल्या व्यक्तीचे स्वतः मुलगा आणि नातू असा लाभ घेणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता.
त्यामध्ये काही दिवसांपूर्वी सुधारणा होऊन यादीमध्ये असणारा व्यक्ती, स्वतः मुलगा नातू आणि पणतू अशी सुधारणा करण्यात आली परंतु ज्या व्यक्तीचे नाव भूकंपग्रस्त मदत मिळालेले व्यक्तींच्या यादीमध्ये असेल, आणि एकत्रित कुटुंबाचे त्यावेळी एकत्रित कुटुंब प्रमुख म्हणून सर्वात मोठ्या भावाला किंवा बहिणीला लाभार्थी यादी मधील नोंदविण्यात आले. परंतु त्यामध्ये असणाऱ्या इतर अज्ञान व्यक्तीचा या यादीमध्ये समावेश झाला नाही. त्याचबरोबर एकत्रित कुटुंबातील इतर परगावी असतील तर अशा लोकांचाही समावेश भूकंपग्रस्त मदत यादीमध्ये समावेश झाला नाही. त्यामुळे ती कुटुंबात असतानाही आणि प्रत्यक्ष भूकंपग्रस्त असतानाही त्याला भूकंपग्रस्त लाभ घेण्यास अधिकाऱ्यांच्या धोरणामुळे अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे खरंच भूकंपग्रस्त दाखला पात्र लाभार्थी यांना खरंच लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करावयाचे असल्यास राज्य शासनाने दाखला वितरण प्रक्रियेत बदल करण्यासाठी, नवीन शासन निर्णय करून सुधारणा करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचे कडे भूकंपग्रस्त दाखला वितरणातील प्रक्रियेमध्ये सुधारणा करावी अशी मागणी केली असून त्याच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसन मंत्री ना.मकरंद पाटील,महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.