
श्रावणातील पहिल्याच सोमवारी श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी
श्रावणातील पहिल्याच सोमवारी श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. निसर्गरम्य अशा डोंगरकपारीत धारेश्वरच्या शुभ्र धबधब्याच्या साक्षीने शिवहरा शिवहराचा जयघोष करण्यात आला. भाविकांसाठी देवस्थानने दर्शनासाठी चांगली व्यवस्था केली होती. आंगवली येथील मूळ मार्लेश्वर मठातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देवरूख एसटी आगाराने जादा बसेस सोडून भाविकांची सोय केली होती.