श्रीवर्धनचे सुपुत्र राजेश मापुस्कर आणि रोहन मापुसकर नव्या चित्रपटासाठी पुन्हा एकदा एकत्र.

श्रीवर्धनचे सुपुत्र राजेश मापुस्कर आणि रोहन मापुसकर ही दोन नाव चित्रपटसृष्टीत नेहमीच कौतुकास पात्र ठरलेली आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता व्हेंटीलेटर या चित्रपटाने राजेश मापुस्कर यांच्या दिग्दर्शनातील क्षमता दाखवून दिली. तर त्याच चित्रपटासाठी रोहन मापुसकर यांनी कास्टिंग डायरेक्टर म्हणून महत्वाची भूमिका निभावली होती. आता हे दोघे पुन्हा एकदा एका खास चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.

नवीन वर्षात प्रेक्षकांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीला रंगतदार बनविण्यासाठी मापुस्कर भावंडांच्या नवा चित्रपट एप्रिल-मे ९९ येत्या काही दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.विशेष म्हणजे या चित्रपटाचे चित्रिकरण श्रीवर्धन परिसरात झाले आहे. या चित्रपटाचा टीझर मु. पो. बोंबिलवाडी या चित्रपटासोबत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल असा विश्‍वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केलं आहे. निर्मिती राजेश मापुस्कर यांची आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

एप्रिल मे ९९ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीचा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चित्रपटातील कलाकारांची टीम मजबुत आहे, शिवाय श्रीवर्धनसह कोकणातील कलाकारांची मोठी टीत चित्रपटात दिसणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button