
फिट इंडिया’ मोहिमेंतर्गत राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा चौथ्या क्रमांकावर
फिट इंडिया’ मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने केली जात आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण शाळांपैकी 65.92 टक्के शाळांची नोंदणी झाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली.
मुलांच्या शारीरिकद़ृष्ट्या तंदुरुस्तीसाठी केंद्र शासनाने ‘फिट इंडिया’ मोहीम हाती घेतली आहे. शारीरिक सुद़ृढतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून त्याबद्दल जागृती निर्माण करणे, शारीरिक क्षमता मूल्यमापन चाचण्या या शाळास्तरावर घेऊन विद्यार्थ्यांची मूल्यमापनविषयक माहिती संकेतस्थळावर किंवा मोबाईल अॅपद्वारे भरण्यात यावी आदी उद्देश यशस्वी व्हावे याकरिता ‘फिट इंडिया’ मोहिमे ंतर्गत सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात येत आहे.
www.konkantoday.com




