
वाशिष्ठी डेअरीच्या कृषि महोत्सवाचे उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार.
वाशिष्ठी मिल्क ऍण्ड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. आयोजित कृषि व पशुधन कृषि महोत्सवास गेल्या वर्षी मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षीदेखील कृषि महोत्सव दिनांक ५ ते ९ जानेवारी दरम्यान चिपळूण बहाद्दूरशेख नाका येथील स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर मैदानात आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन झाले असून या महोत्सवाचे उदघाटन केंद्रीय माजी कृषि मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.www.konkantoday.com