
रत्नागिरी ते मुंबई कोकणकन्या एक्सप्रेसने प्रवास करताना वृद्धेचा मृत्यू.
कोकणकन्या एक्सप्रेसमधून रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास करणार्या रेखा अनंत जाधव (६१, रा. भालावली, राजापूर) या वृद्धेचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.कोकणकन्या एक्सप्रेसमधून प्रवास करण्यासाठी जाधव कुटुंबिय एसटीने रत्नागिरी रेल्वेस्थानकात आले होते. तेथून कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल डब्यात बसले. त्यावेळी रेखा यांना अस्वस्थ वाटू लागले. संगमेश्वर स्थानकात आल्यानंतर त्यांची हालचाल थांबली. याबाबत रेल्वे मदत केंद्राला कळविल्यानंतर जाधव कुटुंबियांना उतरवण्यात आले व रेखा यांना १७८ रूग्णवाहिकेतून कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणी अंती वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. www.konkantoday.com