
चिपळुणात परत परप्रांतीय मिरची व्यापार्यांनी व्यवसाय थाटले.
कर्नाटकसह अन्य ठिकाणांहून अनेक व्यापारी लाल मिरची घेवून विक्रीसाठी चिपळूण शहरासह खेर्डीतील विविध भागात बसले आहेत. त्यांनी २०० रुपये किलो दर ठेवला आहे. मात्र गतवर्षी फसवणूक झाल्याने यावर्षी ही मिरची खरेदी करण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.गेल्यावर्षीपासून परप्रांतीय व्यावसायिक मिरची घेवून येथे विक्रीसाठी येत आहेत.
ते बाजारभावापेक्षा कमी दराने विक्री करीत असल्याने गतवर्षी त्यांच्या व्यवसायावर स्थानिक व्यापार्यांनी आक्षेप घेतला होता. यामुळे वाद निर्माण झाला असतानाच हे बाहेरील व्यावसायिक मिरची लाल दिसण्यासाठी तिला रंग मारताना तसेच अधिक वजन भरण्यासाठी पोत्यांवर पाणी मारताना दिसून आले होते. त्यामुळे अर्धवट व्यवसाय सोडून त्यांना येथून जावे लागले होते.www.konkantoday.com