
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्ष सोहळ्यात ‘शैक्षणिक हब’ उभारणीची उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी, आज रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या शताब्दी वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात रत्नागिरीत उभारण्यात येणाऱ्या ‘शैक्षणिक हब’ संदर्भात उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत महत्त्वपूर्ण घोषणा केली.यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की मी देखील या गोगटे जोगळेकर कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. याच संस्थेतून संघर्ष आणि संयम शिकलो आहे. संस्थेच्या उन्नतीसाठी प्रामाणिकपणे काम करत राहू, असा शब्द दिला.
यावेळी रत्नागिरीत उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांसह विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या स्किल सेंटर उभारण्यात आले आहे. यापुढेही रत्नागिरीला ‘शैक्षणिक हब’ बनवण्यासाठी महायुती सरकारची पूर्ण ताकद देऊ, असे आश्वासन दिले.
*‘शैक्षणिक हब’ संदर्भातील प्रमुख घोषणा:
MIDC द्वारे जमीन: ‘शैक्षणिक हब’ उभारण्यासाठी आवश्यक असलेली जमीन MIDC च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.
रतन टाटा स्किल सेंटर:
रत्नागिरीमध्ये १६० कोटी रुपयांचे अत्याधुनिक ‘रतन टाटा स्किल सेंटर’ उभारण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण मिळेल.
रत्नागिरी आता औद्योगिकदृष्ट्या सक्षम होत असून सेमी कंडक, डिफेन्स सारखे १९ हजार कोटींचे प्रकल्पातून रोजगार निर्माण होणार आहे. यामुळे शिक्षणाचे एक मोठे केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.