
दहा पटाखालील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात शिक्षक समितीचे आंदोलन
दहा पटाखालील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याच्या शासनाकडून हालचाली सुरू असून त्याविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने नवी मुंबई येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले
दहा पटाखालील सर्व जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या शासनाकडून हालचाली सुरू आहेत कोकणातील बहुतेक शाळा डोंगराळ व दुर्गम भागात आहेत तेथील वाडीवस्तीवरील शाळांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी व गोरगरीब ग्रामस्थांच्या मुलांना शिक्षण मिळत आहे केवळ पटसंख्या कमी हे कारण करून शाळा बंद केल्यास बहुतांश मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत या धरणे आंदोलनात पाचशेहून अधिक शिक्षक सहभागी झाले होते.
www.konkantoday.com




