
*लांजात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी पळविले*____
रत्नागिरी – पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून दुचाकीने पलायन करणार्या दोघा अज्ञात चोरट्यांविरूद्ध लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास तालुक्यातील वाटूळ-दाभोळे मार्गावर भांबेड पवारवाडी येथे घडली.पोलिसांच्या माहितीनुसार नम्रमा चंद्रकांत कोकाटे (५३, रा. भांबेड वळणवाडी) शनिवारी सायंकाळी त्यांच्या मुलीची सासू शारदा बागवे यांच्याकडे वाटूळ ते दाभोळेत जाणार्या रस्त्यावरून चालत जात होत्या. भांबेड पवारवाडी येथील जयराम पवार यांच्या घरासमोर त्या आल्या असता काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेेले दोघेजण रस्त्याच्या एका बाजूला उभेहोते. यातील एका अज्ञात इसमाने कोकाटे यांच्या पाठीमागून येवून त्यांच्या गळ्यातील ५० हजार रू. किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून चोरून नेले. तर दुसर्या चोरट्याने त्यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे दोघेही चोरटे दुचाकीवरून भांबेडच्या दिशेने पळून गेले. www.konkantoday.com