खारवी समाज नागरी पतसंस्थेने 97.54% वसुली करत मिळविला 30 लाखांचा निव्वळ नफा- संतोष पावरी

_रत्नागिरी: अवघ्या 5 वर्षात स्वप्नवत वाटचाल करत,आर्थिक शिस्त कटाक्षाने जपत, सातत्याने अर्थकारण पुढे नेत आणि सातत्याने ते अग्रस्थानी ठेवत खारवी समाज विकास पतसंस्थेने प्रधान कार्यालया सोबत नवीन 5 शाखा विस्तारांच्या माध्यमातून व 5227 सभासदांच्या सहभागातून 97.54% वसुली करत मिळविला 30 लाखांचा निव्वळ नफा.●प्रतिवर्षप्रमाणेच या आर्थिक वर्ष अखेरीला संस्थेने सातत्यपूर्ण आर्थिक वृद्धी केली असून मागील वर्षाच्या तुलनेत संस्थेच्या ठेवीत 63.7% वाढ होऊन 14 कोटी 80 लाख ठेवी झाल्या आहेत. कर्ज वितरणात 50.5% वाढ होऊन 11 कोटी 15 लाख एवढे कर्ज वितरण झाले आहे. गुंतवणूकित 57.1% वाढ होऊन 4 कोटी 74 लाख गुंतवणूक झाली आहे. वसुलीच्या प्रमाणात 0.5 % वाढ होऊन 97.54 % वसुली झाली आहे. निव्वळ नफा 19.9% ने वाढून 30 लाख 1 हजार एवढा निव्वळ नफा झाला आहे. 67.04 % एवढा सी.डी. रेशो आहे. संस्थेचा स्वनिधी 20.3 % या प्रमाणात वाढून 1 कोटी 74 लाख एवढा झाला आहे. संस्थेची मजबूत आर्थिक ताकद दर्शक निधी म्हणून याकडे पाहिले जाते. सहकार खात्याने लागू केलेली किमान 9% प्रमाण ठेवणे अनिवार्य असताना संस्थेचा सीआरएआर 15.57 % इतका लक्षणीय असून संस्थेची आर्थिक भक्कम स्थिती या माध्यमातून दिसून येते. संस्थेचे खेळते भांडवलामध्ये 59.7% वाढ होऊन 17 कोटी 67 लाख झाले आहे.●अल्पावधीतच शाखविस्तारांचा प्रस्ताव सादर करून शृंगारतळी, दाभोळ , खंडाळा,पालशेत, पुर्णगड अशा पाच शाखा मंजूर झाल्या आणि गत वर्षभरात या पाच ही शाखांचा प्रारंभ ही झाला आहे.5 पैकी 4 शाखांचे वसुलीचे प्रमाण 100% आहे.सलग 5 वर्षे संस्थेने ‘अ’ वर्ग प्राप्त केला आहे. विशेष उल्लेखनीय बलस्थाने निर्माण करत स्थापने पासूनच संस्थेचा संपूर्ण व्यवहार संगणिकृत आहे.सर्व शाखा सीसीटीव्ही च्या निगराणी खाली आहेत.पहिल्या वर्षापासूनच सभासदांना शेअर्स च्या रकमेवर संस्था लाभांश वाटप करत आलेली आहे.मार्केटिंग साठी प्रति वर्षी सर्व सभासदां प्रत्यक्ष रूपाने पोहचण्यासाठी सर्व संचालकांसमवेत’ पतसंस्था आपल्या दारी’ हा सलग 5 दिवसांचा प्रवास दौरा करणारी एकमेव संस्था आहे.सभासदांचे मनोबल उंचावून सभासदांमध्ये खऱ्या अर्थाने सहकार रुजवणारी पतसंस्था.सभासदांना RTGS, NEFT, IMPS ,QR CODE ,SMS BANKING या आधुनिक सुविधा पुरविण्यायासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा जलदगतीने स्वीकार करणारी पतसंस्था.अत्यल्प थकबाकी, विक्रमी वसुली ही परंपरा कायम ठेवण्यात संस्था याही वर्षी यशस्वी झाली आहे.●आपल्या अर्थकारणात व्यावसायिकता आणि सहकारतत्त्व यांची सांगड घालून विस्तारत आहे. सहकारातील सामुहिक ताकद निर्माण करताना नवतंत्रज्ञान, व्यवसाय,संधी याचा कायद्याच्या परिघात राहत अचूक लाभ उठवत ग्राहकांनाही या लाभात सहभागी करून घेणरी पतसंस्था.ग्राहकांचा विश्वास जपत , पतसंस्था अधिक उत्तम अर्थकारण नवनवीन योजना राबवून पार पाडेल असा विश्वास व्यक्त करताना सर्व ठेवीदार, कर्जदार, पिग्मीदार, सभासद, कर्मचारी, अधिकारी, पिग्मी प्रतिनिधी, संचालक, सहकारी, ऑडिटर, वकील, सहकार खात्याचे सर्व अधिकारी यांचा मोलाचा वाटा असून संस्था या सर्वांचीच ऋणी आहे. सर्वांनी दिलेल्या अनमोल सहकार्यामुळे खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे अर्थचक्र गतिमान राहिले. त्याबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. व आगामी वाटचालीमध्ये अशाच पद्धतीने सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो असे पावरी यांनी म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button