
गुगल पे’वर पैसे मारतो सांगून व्यापार्यांची फसवणूक.
पाचशे रुपये द्या, गुगल पे वर परत करतो असे सांगत एका मोबाईल फोन अॅपद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरातील व्यापार्यांना गंडा घालणार्या एका महाविद्यालयीन युवकाला शहरातील व्यापार्यांनी शिताफीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.संबंधित युवकाने गेल्या चार दिवसात शहरातील अनेकांना अशाप्रकारे गंडा घातला असून अनेक व्यापारी यामध्ये फसले असल्याची चर्चा आहे.
सावंतवाडी शहरालगतच्या एका गावातील हा महाविद्यालयीन तरुण असून त्याने गेल्या चार दिवसांमध्ये शहरातील व्यापार्यांकडे माझ्याकडे कॅश नाही आहे. गुगल पे ला पैसे आहेत, मला रोख रक्कम द्या, मी तुम्हाला गुगल पे करतो असे सांगून समोरील व्यक्तींच्या गुगल पे च्या स्कॅनरवर पैसे पाठवल्याचे दाखवतो. परंतु संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे जमा होत नाहीत.