
कोकणात येण्यासाठी पर्यटकांची गर्दी, मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा.
कोकणात येण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची रीघ लागली आहे.जिल्ह्यातील समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले आहेत. सर्व हॉटेल्स, लॉज हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी नाताळची सुटी असल्याने थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी कोकणातील समुद्र किनाऱ्यांकडे पर्यटकांची पावले वळतात.
यावर्षीदेखील पर्यटकांनी कोकणची निवड थर्टी फर्स्टसाठी केली आहे. मंडणगड तालुक्यातील वेळास, आंजर्ले, दापोली तालुक्यातील हर्णै, मुरूड, लाडघर, कर्दे, दाभोळ, गुहागर तालुक्यातील गुहागर, वेळणेश्वर, हेदवी, बुधल आदी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत.