
मुंबई एपीएमसी फळ बाजारात स्पेन आणि ब्राझीलचा हापूस दाखल
हापुस आंब्याची गोडी साऱ्या जगाला लागली असतानाच आता भारतात देखील परदेशी आंबा दाखल होत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अफ्रिकन देशातील मलावी हापूस आंबा भारतात दाखल झाला होता. तर आता सध्या मुंबई एपीएमसी फळ बाजारात स्पेन आणि ब्राझीलचा हापूस दाखल झाला आहे. मात्र याची किंमत जास्त असल्याने या फळाला तुलनेने मागणी कमी आहे अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.ब्राझील आंब्याची चव राजापुरी आंब्याप्रमाणे असून त्याची किंमत साडेचार किलोला( एक१पेटी ) ३६०० ते ४०००रु आहे.
www.konkantoday.com