
इळणे गावचा रूपेश हरिश्चंद्र मुरुडकर यांची दूरदर्शन वाहिनीवर ‘जल्लोष माय मराठी ‘ या कार्यक्रमामध्ये शिट्टी वाजणार
आगळ्यावेगळ्या शिट्टी वादन कलेसाठी प्रसिद्ध असणार्या दापोली तालुक्यातील इळणे गावच्या रूपेश हरिश्चंद्र मुरुडकर यांची दूरदर्शन वाहिनीवर ‘जल्लोष माय मराठी ‘ या कार्यक्रमामध्ये शिट्टी वाजणार आहे.नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दि. 31 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता आपल्या अनोख्या अंदाजात शिट्टीवादन करण्याची संधी रूपेश यांना लाभली आहे.कोकणातील आणि दापोली तालुक्यातील अष्टपैलू कलावंत म्हणून शिट्टी वादनात रुपेश मुरुडकर यांची छाप आहे. या कार्यक्रमाचे आयोजन निरंजन पाठक यांनी केले आहे.
या कार्यक्रमात रुपेश यांना निरंजन पाठक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.मुरुडकर यांना आपल्या आगळ्या वेगळ्या शिट्टी वादन कलेमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रम करण्याची संधी मिळाली आहे. मे 2024 रोजी पुण्यात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये रुपेश मुरुडकर यांनी पहिला येण्याचा मान पटकावला आहे.