
निसर्गामुळे नाही तर मानवी हस्तक्षेपामुळे कातळ शिल्पांना धोका
मानवी बुद्धी, सभ्यता व संस्कृतीची टप्पे विषद करणारी कोकणातील जांभ्या कातळावर कोरलेली कातळ शिल्पे बदलत्या काळात माणसाच्या आर्थिक क्रियांच्या अतिक्रमणामुळे अडचणीत आलेली असल्याची चिंता संशोधक व शिल्पप्रेमींमध्ये व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातही कातळशिल्पे आढळून आलेली आहेत. त्यांचे आयुष्यमान हजारो वर्षापुर्वीचे असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. कोकणातील मोकळ्या माळ रानावर हजारो वर्षापूर्वी कोरण्यात आलेल्या शिल्पांना निसर्गापासून कोणताही धोका नाही, तसे असते तर काळाच्या ओघात त्यांचे अस्तित्व नामशेष झाले असते. इतक्या प्रदीर्घ काळातील ऊन, वारा, पाऊस व उष्णता वा वातावरणातील बदलांचा या शिल्पावर काहीही परिणाम झालेला नाही. www.konkantoday.com