निवळी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान.

रत्नागिरीतील निवळी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान देण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी बिबट्या विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती वन विभागाला दिल्यानंतर बिबट्याच्या सुटकेसाठी रेस्क्यु ऑपरेशन राबवण्यात आले .शुक्रवार 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 05.30 वाजताच्या दरम्यान निवळी गावडेवाडी नंबर 2 जवळ किरण रघुनाथ साळवी यांच्या फार्म हाऊस येथील विहिरीत भक्ष्याचे शोधात असलेला बिबट्याचा बछडा विहिरीतील पाण्यात पडल्याचे प्रथम फार्म हाऊसचे केअर टेकर घाणेकर यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी विनय मुकादम, सुभाष मालप यांना कळवून ही माहिती निवळी गावचे उपसरपंच संजय नीवळकर यांना दिली.पिंजऱ्याच्या साह्याने व ग्रामस्थांच्या मदतीने वनविभाग व पोलिसांना बिबट्याच्या बछड्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. साधारण रात्री 09.30 वाजताच्या सुमारास बिबट्याच्या बछड्याला पिंजऱ्यात कैद करून विहिरीतून सुखरूपपण बाहेर काढण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button