
कार मालकांनो लक्ष द्या, हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या किंमती झाल्या जाहीर, मोजावे लागणार ‘इतके’ पैसे!
सर्वोच्च न्यायालयाने आता सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी तयार केलेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. हा निर्णय वाहतुकीची सुरक्षा वाढवण्यासाठी, वाहनांची ओळख पटवण्यासाठी आणि वाहनांवरील छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या किंमती सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) लावण्यासाठी वाहन मालकांना 531 ते 879 रुपये मोजावे लागणार आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने ही माहिती दिली आहे. बुधवारपासून परिवहन विभागाची पेमेंट लिंक चालू झाली आहे. या किंमतीमध्ये नंबर प्लेटच्या स्नॅप लॉकची किंमत आणि वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST देखील समाविष्ट असणारआहे.हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लागू करण्यासाठी ट्रॅक्टर, बाईक आणि स्कूटर यांसारख्या दुचाकींसाठी 531 रुपये, ऑटो-रिक्षासारख्या तीनचाकी वाहनांसाठी 590 रुपये आणि कार, बस, ट्रक, टँकर, टेम्पो आणि ट्रेलर यासारख्या मोठ्या वाहनांसाठी 879 रुपये खर्च येईल.राज्य परिवहन विभागाने एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी त्यांच्या वेबसाइटवर आणि समर्पित वेबपेजवर ‘अपॉइंटमेंट’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
वेबसाइटवर वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी HSRP दर देखील नमूद केले आहेत. त्यावरही 18 टक्के दराने जीएसटी लावला जाईल.दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी 200 मिमी X100 मिमी आणि 285 मिमी X 45 मिमी आकाराच्या प्रत्येक एचएसआरपी प्लेटची किंमत 219.9 रुपये असेल. तर चार किंवा अधिक चाकी वाहनांसाठी 500 मिमी X 120 मिमी आणि 340 मिमी X 200 मिमी आकाराच्या प्लेटची किंमत 342.41 रुपये असेल. GST वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी स्नॅप लॉक आणि थर्ड रजिस्ट्रेशन मार्कची किंमत अंदाजे 10.18 आणि 50 रुपये असेल.
चार किंवा त्याहून अधिक चाकी वाहनांसाठी HSRP लावण्यासाठी 81 रुपये, तीन चाकी वाहनांसाठी 90 रुपये आणि चार किंवा अधिक वाहनांसाठी 134.10 रुपये असेल. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांवरही पुढील आणि मागील बाजूस HSRP आणि त्यांच्या विंडशील्डवर नोंदणी चिन्हाचे स्टिकर लावले जातील.