
गणपतीपुळे परिसर पर्यटकांनी फुलला.
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गणपतीपुळे हे भाविकांचे आणि पर्यटकांच्या फिरण्यासाठी अत्यंत आवडते ठिकाण आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्यातून हजारो पर्यटक गणपतीपुळ्यात, सुट्ट्या असल्याने दाखल होतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील सरत्या वर्षाचा निरोप घेण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागत प्रसंगी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांनी तसेच भाविकांनी गर्दी केली.
यावेळी दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत. तर पर्यटक समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट, घोडेसवारी याचा आनंद घेताना दिसतात. पर्यटकांमुळे गणपतीपुळ्या मधील सर्व हॉटेल फुल झाले आहेत. यावर्षी पर्यटन वाढल्याने स्थानिक व्यवसायांना याचा चांगला फायदा झाला.