राजापुरात जवाहर चौकात लागलेला ‘राजापूर नपुंसक नाही उमेदवार देण्यासाठी’ अशा आशयाचा बॅनर झळकला.

राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवार हवा, अशी मागणी मागील काही दिवसांपासून जोर धरत असताना आता तर राजापुरात यावरून बॅनरबाजीदेखील सुरू झाली आहे.सध्या शहरातील जवाहर चौकात लागलेला ‘राजापूर नपुंसक नाही उमेदवार देण्यासाठी’ अशा आशयाचा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.राजापूर विधानसभा मतदारसंघातून यावेळी स्थानिक उमेदवाराला प्राधान द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हाच धागा पकडत राजापूर शहरातील जवाहर चौक येथे मी राजापूरकर या नावाने ‘उमेदवार देण्यासाठी राजापूर नपुंसक नाही’ अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे. हा बॅनर सध्या राजापूर तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. हा बॅनर कोणी लावला त्याचे नाव समजू शकले नसले तरी राजापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवार देताना सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक उमेदवाराच्या नावाचा विचार करायला लावण्यासाठी हा बॅनर दुवा ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button