
मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार
मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. या कामाच्या फाऊंडेशनची खोदाई सुरू करण्यात आली आहे. कांस्य धातूपासून 60 फूट उंचीचा 8 मि.मी.जाडीचा पुतळा याठिकाणी उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारने याठिकाणी 60 फूट उंच पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅट्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. देशभरात मोठमोठे पुतळे दर्जेदार पद्धतीने उभरण्याचा मोठा अनुभव त्यांना आहे.