
आमदार भास्कर जाधव समर्थक मोठ्या संख्येने मुंबईकडे
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे तीन दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.त्यामुळे उद्या 13 तारखेला जाधव हे मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश करणार हे सर्व जिल्ह्याला माहित होते.आमदार जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम उद्या दुपारी मातोश्रीवर होणार आहे.या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गुहागर,चिपळूण मतदारसंघातून भास्करराव जाधव यांचे समर्थक मोठ्या संख्येने आतापासूनच मुंबईकडे रवाना होत आहेत.जाधव यांनी गुहागरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगले संघटन उभारले होते व गुहागर ग्रामपंचायतींवरही त्यांची पूर्ण सत्ता होती. जाधव हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने गुहागरमधील पंचायत समितीसह जि.प सदस्य व सध्या राष्ट्रवादीत असलेले जाधव यांचे सर्व कार्यकर्ते जाधव यांचे बरोबर शिवसेनेत जाणार आहेत. भास्करराव जाधव हे राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेनेत म्हणजे स्वगृही परतल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
www.konkantoday.com