ट्रिलियन डॉलर इकॉनोमीची जबाबदारी असलेला नेता – उदय सामंत
उदय या नावातच एक, प्रकाशाचं वेड आहे!
शून्या बदल्यात हजार अशी, स्नेहल परतफेड आहे !
देवगडचा कवी मित्र प्रमोद जोशी उदय सामंत यांच्यावर कविता लिहिताना अशा शब्दात कौतुक करतो.नामदार उदय सामंत यांना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा उद्योग खात्याची जबाबदारी. त्याच मंत्र्याकडे तेच खाते ठेवणं म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती असते आणि नवीन अपेक्षांची जबाबदारी असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीची घोषणा केली आहे.अर्थातच उद्योग खात्यावर याची सर्वाधिक जबाबदारी येते.महाराष्ट्रने अर्ध्या ट्रिलियन डॉलर पर्यंत मजल मारली आहे. म्हणजे पुढच्या दोन वर्षात अर्ध्या ट्रिलियन डॉलरची इकॉनोमी करण्यासाठीची जबाबदारी उद्योग खाते म्हणून अर्थातच ना.उदय सामंत यांच्यावर येते.मुख्यमंत्र्यांनी पुन्हा उद्योग खाते देवून व्यक्त केलेला हा एक विश्वास आहे.कविराज प्रमोद जोशी यांच्या शब्दात सांगायचं झालं तर
udaysamant| Industryminister
उदयाच्या स्थितीमधे,अंधाराला कुठे जागा?
प्रकल्पाना ओवायला, हाती कर्तृत्वाचा धागा !
नामदार उदय सामंत उद्योग मंत्री असताना महाराष्ट्राला परकीय गुंतवणूकीत पहिल्या स्थानावर त्यांनी आणले. देशाच्या गुंतवणुकीच्या 34 टक्के म्हणजे सुमारे 1लाख 25 हजार कोटी रुपये गुंतवणूक महाराष्ट्रात आणली.
वडील अण्णा सामंत यांनी कष्टाने, निष्ठेने उभ्या केलेल्या उद्योगांमध्ये पूर्वीपासूनच उदय सामंत कार्यरत असल्यामुळे उद्योजकांच्या अडचणी त्यांना माहीतच होत्या. स्वतः उद्योजक असल्यामुळे इज ऑफ डूईंग बिझनेसच्या दिशेने त्यांनी पावले टाकायला सुरुवात केली आणि त्यातूनच मैत्री कायदा 2022 अस्तित्वात आला.धोरण, कायदे आणि अंमलबजावणी या तिन्ही गोष्टींची सांगड घालून गतिशील पद्धतीने अनेक गोष्टी पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यातूनच माहिती तंत्रज्ञान धोरण, विविध ठिकाणी होऊ घातलेले क्लस्टर आणि पार्क यासारख्या गोष्टी उदयाला आल्या आहेत.
स्टरलाईट कंपनीच्या ॲल्युमिनियम प्रकल्पासाठी संपादित केलेल्या झाडगाव रत्नागिरी येथील बाराशे एकर जमिनीवर नवीन उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग मंत्र्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच स्वागतार्थ आहे.एखाद्या उद्योगाला जागा दिली की जागा काढून घेणे फारच कठीण असते आणि त्यामध्ये कोर्ट केस झाली तर ती जागा ताब्यात घेऊन दुसऱ्या प्रकल्पासाठी देणे, ही केवळ अशक्य गोष्ट असते. ना सामंत यांनी ज्या वेगाने प्रशासकीय ताकद वापरली. न्यायालयात उत्तम पद्धतीने मांडणी करून एमआयडीसीला जागा परत मिळवली. ही गोष्ट केवळ अशक्य वाटणारी आहे, परंतु त्यांनी वास्तवात आणली आहे. आता त्याच जागेवर वेल्लोर सेमीकंडक्टर हा 19,550 कोटीचा प्रकल्पाचे भूमिपूजन ना उदय सामंत यांनी केले आहे. दीड हजार युवकांना प्रशिक्षण घेऊन या कंपनीमध्ये रोजगार मिळणार आहे.या बरोबरीने धीरूभाई अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने एरोस्पेस आणि सुरक्षा उपकरण दहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डिफेन्स क्लस्टर ची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.या दोन्हीतून 38 हजार तरुणांना रोजगार मिळेल. एरोस्पेस आणि सेमीकंडक्टर या दोन्ही क्षेत्रामध्ये महत्त्वाचा खेळाडू म्हणून महाराष्ट्राचे स्थान भक्कम होण्यास मदत होणार आहे.
रत्नागिरीच्या मिऱ्या बंदरावर असलेली भारतीय शिपयार्ड ही कंपनी 2014 पासून बंद होती ही कंपनी पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने उद्योग मंत्री म्हणून सुरू केलेले प्रयत्न रत्नागिरीतील तरुणांच्या रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
आंबा,काजू,फूड, मरीन पार्क : कोकणातल्या आंबा,काजू , कोकम आणि मासे या दोन मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या वस्तूंवर प्रक्रिया उद्योग असणे आवश्यक होते. रत्नागिरी निवेंडी येथे 250 एकर वर आंबा,काजू,फूड, आणि फिश पार्क प्रकल्प उभारण्यात येणार आहे.राजापूर वाडी खुर्द 250 एकर वर एमआयडीसी, रत्नागिरी रिळ उंडी 800 एकर वर डिफेन्स क्लस्टर, वाटद येथे 1000 एकर वर एमआयडीसी, करण्याचे नियोजन ना. सामंत यांनी केले आहे. हे सर्व प्रकल्प कार्यान्वित झाले की रत्नागिरीचा जीडीपी पहिल्या तीन मध्ये असेल.
उद्योग विभाग
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत 800 लाभार्थ्यांना फायदा मिळवून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे उद्योग विभागाने 366 केसेसना मंजुरी दिली असून उद्योग विभाग यासाठी वेगाने काम करीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग विभागाच्या पुढाकाराने विविध क्लस्टर उभे करण्याच उद्योग मंत्र्यांच्या मनात असून यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेऊन प्रशासन गतिमान केला आहे. राजापूरला काजूचे क्लस्टर, लांजा तालुक्यात पुनस येथे काजूचे क्लस्टर,चिपळूणला महिला बचत गटांसाठी गारमेंट आणि पॅकिंग मटेरियल चे क्लस्टर आणि हर्णे ड्राय फिश क्लस्टर साठी प्रयत्न सुरू आहेत.
मैत्री कायदा
गुंतवणुकीला प्रोत्साहन, औद्योगिक सुविधा, व्यवसाय सुलभीकरण व उद्योगांसाठी आवश्यक परवानग्या / मंजुरी आणि सेवा कालमर्यादेत देण्याच्या दृष्टिने उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, 2022 ना. उदय सामंत यांनी मैत्री केला,मैत्री कक्षाला वैधानिक दर्जा मिळाल्याने उद्योगासाठी लागणाऱ्या परवानग्या अधिक वेगवान आणि सुलभ होतील,
नवे माहिती तंत्रज्ञान धोरण
उद्योग मंत्र्यांनी आयटी उद्योगाला चालना देण्यासाठी नवे माहिती तंत्रज्ञान धोरण तयार केले आहे. राज्यात 95 हजार कोटींची नवीन गुंतवणूक आणण्याचे सरकारचे उद्दीष्ट ठेवून राज्य सरकार नवे माहिती तंत्रज्ञान धोरण आणले आहे. या धोरणामुळे राज्यात साडेतीन लाख रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे. यातून 10 लाख कोटी निर्यातीचे लक्ष्य उद्योग विभागाने ठेवले आहे. नव्या आयटी धोरणामध्ये स्टार्टअप व इनोव्हेशन,हायब्रिड वर्कींग, सिंगल टेक्नॉलॉजी इंटरफेस,भविष्यातील कौशल्ये,वॉक-टू-वर्क,टॅलेन्ट लॉन्चपॅड,प्रादेशिक विकास,कामगिरीचे संनियंत्रण,आदी तरतूदींचा समावेश आहे.
युनिकॉर्न
स्टार्टअप युनिकॉर्नच्या संख्येच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. भारताने 110 पेक्षा जास्त युनिकॉर्न तयार केले आहेत. राज्यात जन्मलेले आहेत किंवा त्यांचे मूळ गाव तेथे आहे. असे महाराष्ट्रात सर्वात जास्त 40 युनिकॉर्न संस्थापक निर्माण झाले आहेत.येणाऱ्या काळात युनिकॉन कंपन्या करू पाहणाऱ्या नव्या स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी नाविन्यतेस पूरक,स्टार्टअप्सना पाठबळ पुरवणाऱ्या विविध उपक्रम व योजनांद्वारे महाराष्ट्राला स्टार्टअप हब बनविण्यासाठी उद्योग विभाग कार्य प्रवण झाला आहे.
रत्नागिरी, जालना, भिवंडी, अकोला, सांगली, जळगाव आणि सोलापूर या ठिकाणी मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क करण्यासंदर्भात उद्योगमंत्री यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील वाहतुक खर्च हा 16 टक्के वर जात आहे तो खर्च सहा ते सात टक्के पर्यंत कमी करण्याच्या दृष्टीने याचा उपयोग होणार आहे.
महाराष्ट्र राज्याची एक ट्रिलियन डॉलर इकॉनोमी करण्याचे एक आव्हानात्मक काम ना सामंत यांच्यासमोर आहे.गतिमान प्रशासन, उद्योग स्नेही वातावरण, परवानग्यांचे सुलभीकरण,अतिशय उत्तम दर्जाचे रस्ते,जल आणि विमान वाहतूक,अखंडित आणि स्वस्तात वीज पुरवठा,कौशल्य आधारित शिक्षण आणि कौशल्य प्राप्त मनुष्यबळ,गतिमान पद्धतीने काम करणारी धोरणात्मक परिसंस्था करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
डॉ. प्रशांत पटवर्धन
लेखक फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्टिक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष आहेत.