
कळंबस्ते येथे इनोव्हा व क्रुझर अपघातात चार जखमी
चिपळूण ः मुंबई-गोवा महामार्गावर कळंबस्ते बौद्धवाडी येथे इनोव्हा व क्रुझर यांच्यात एका गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात क्रुझरने समोरासमोर देवून झालेल्या अपघातात चारजण जखमी झाले.
मेहबूब खॉंजाशेख (३२, रा. मुंबई), याने इनोव्हा मुंबईहून भाडे घेवून चिपळूणकडे येत होती. याच दरम्याने कर्नाटकहून लोटेकडे जाणारी क्रुझर एका गाडीला ओव्हरटेक करून इनोव्हावर धडकली. यामुळे दोन्ही गाड्यांच्या समोरील भागाचे नुकसान झाले. या अपघातात क्रुझरमधील हनीफ नबिल नझफ हा तर इनोव्हामधील जगदीश चंद्रकांत सावंत, मुग्धा महेश सावंत, अनिल शंकर लाड सर्व रा. भाईंदर हे जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी एसएमएस हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.