
दापोली तालुक्यात जालगाव येथे विकलांग मतिमंद मुलांसाठी शाळेचा शुभारंभ
दापोली तालुक्यात शहराजवळ जालगाव येथे विकलांग मतिमंद मुलांसाठी शाळेचा शुभारंभ करण्यात आला.
१५ ऑगस्ट रोजी रविवारी या शाळेचे दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले. यावेळी पं.स.सभापती योगिता बांद्रे,जि. प. सदस्य चारुता कामतेकर किशोर देसाई, भाऊ इदाते, महेश्वरी विचारे, जालगावचे उपसरपंच श्री.लिंगावळे,सुजय मेहता, आशिष मेहता,गोपळ कृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष राकेश कोटिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या विकलांग मतिमंद मुलांच्या जीवनात आनंद फुलावा त्यांना समाजप्रवाहात आणावे या सामाजिक जाणीवेतून ही शाळा सुरु करण्यात आली आहे
www.konkantoday.com