
खेडमध्ये गोवंश हत्याप्रकरणी खेड पोलिसांची तत्काळ कारवाई, चोवीस तासांच्या आतमध्ये मुद्देमालासह तीन आरोपी अटकेत
खेड शहरालगत वाहणार्या नारंगी नदी पात्रात गेल्या दोन दिवसांपासून सापडणार्या गोवंश अवशेष प्रकरणी खेड पोलिसांनी चोवीस तासांच्या आतमध्ये गोवंश हत्या करणार्या तीन आरोपींना मुद्देमालासह पकडून अट केली आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचा शोध देखील सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक जीवंत बैल तसेच मांसदेखील जप्त केले असल्याची माहिती खेडचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिली.दरम्यान, गोवंश अवशेष सापडल्यामुळे खेडमध्ये तणावाचे वातावरण होते, मात्र आता नागरिकांनी कोणताही बंद पाडू नये, तसेच सोशल मिडियावर अफवा पसरविणार्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही श्री. राजमाने यांनी सांगितले.www.konkantoday.com