रवी राजा यांचा काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश

मुंबई महापालिकेत लक्षवेधी काम करणारे करणारे नेते रवी राजा यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. आज देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. निवडणूक काळात रवी राजा यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.मुंबईचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर झालेल्या भाजपच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी बड्या राजकीय भुकंपाचे संकेत दिलेत. काही चांगले पक्षप्रवेश हे भाजपमध्ये होऊ शकतात. तुम्ही त्याची वाट पाहा. आज मला विचारू नका. असे फटाके सुरू राहतील. रवी राजांच्या संपर्कात अनेक लोक आहेत. त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. येणाऱ्या काळात ते आमच्यासोबत येतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.रवी राजा यांच्यासारखा मातब्बर नेता, ज्यांनी पालिका गाजवली, मावळत्या महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. आक्रमक भूमिका मांडणारे नेते. पाच टर्म महापालिकेत निवडून आले. एक विक्रम त्यांच्या नावाने आहे, २३ वर्ष त्यांनी बेस्टचे सदस्य म्हणून काम केलं. बेस्ट संदर्भात पालिकेत रवी राजा यांच्याकडे ऑथेरिटी म्हणून बघितलं जातं. जनसंपर्क असलेला नेता. काँग्रेस नेत्यांशी त्यांचा कनेक्ट आहे. आम्हाला रवी राजा यांचा फायदा होईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button