
आंबा व काजू पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता.
कोकणात या आठवड्यात अचानक थंडीत वाढ झाली आहे. हा थंडीचा तडाखा अजून काही दिवस कायम राहणार आहे; मात्र यामुळे आंबा व काजू पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने वर्तवली असून, या संदर्भात बागायतीची काळजी घेण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या आहेत.याबाबत कृषी विद्यापीठाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. कोकणामध्ये वाढलेली थंडी पुढील आठवडाभर राहण्याची शक्यता आहे तसेच बंगालच्या उपसागरात तामिळनाडूच्या किनारपट्टीनजीक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, पुढील काही कालावधीसाठी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.