
कोकणासाठी विशेष वेगळे पॅकेज देण्याची विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची आग्रही मागणी
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अलिबाग तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात शेतीमाल व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. आता चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना नैसर्गिक आपत्तीचे पारंपारिक नियम डावलून कोकणासाठी विशेष वेगळे पॅकेज देण्याची आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे
www.konkantoday.com