संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात ३ रेल्वे गाड्यांच्या थांब्याच्या मागणीवर कोकण रेल्वे कडून अद्याप निर्णय नाही……

नवीन वर्षाची सुरवात आंदोलनाने करण्यावाचून पर्याय नाही*संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात मडगाव एक्सप्रेस, जामनगर एक्सप्रेस आणि पोरबंदर एक्सप्रेस या तीन नवीन गाड्यांच्या थांब्यांसाठी गेले वर्षभर पाठपुरावा करत असलेली निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर फेसबुक ग्रुप ने या मागणीवर लवकर निर्णय होऊन कोकण रेल्वे प्रशसन वर्षाचा शेवट संगमेश्वर करांना गोड बातमी देऊन करेल अशी अपेक्षा केली होती परंतु वर्ष सरायला काहीच दिवस शिल्लक राहिले असले तरी अजुन याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाकडून काही हालचाल होताना दिसत नाही.

थांब्यायसंदर्भात रेल्वेने ३१ डिसेंबर पर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी आशा आश्याचे पत्र या संघटनेने रेल्वेला दिले असून तसे न झाल्यास उपोषणासारख्या आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल असा इशारा दिला होता. त्यानुसार वर्षाच्या शेवटपर्यंत यावर निर्णय न झाल्यास नवीन वर्षाची सुरवात अंदोलनाने करावी लागणार असल्याचे संघटनेचे प्रमुख श्री संदेश जिमन यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button