माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी प्रकृती खालावल्याने ठाण्यातील रुग्णालयात दाखल.
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला प्रकृती खालावल्याने ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे आणि सर्व आवश्यक चाचण्या केल्या गेल्या असून डॉक्टरांनी त्याला निरीक्षणाखाली ठेवले आहे.त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आता त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र तो तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे.