
भोवनी चित्रपटातील उधळू दे वारू गीत प्रदर्शित
रत्नागिरी:रमेश कीर कला अकादमीतून अभिनय-दिग्दर्शनाचा डिप्लोमा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व अकादमीचे विभागप्रमुख प्रदीप शिवगण यांनी कोकणातच सिनेमाच्या निर्मितीची बीजे रोवली. त्यातूनच भोवनी चित्रपट पूर्ण केला असून या चित्रपटातील उधळू दे वारू हे गीत नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
हा चित्रपट करण्यासाठी ग्रामस्थ व स्थानिक कलाकारांनी मदत केली. बरेच कलाकारही स्थानिक असल्याने हे गीत जाकादेवी येथील किसान भवनमध्ये करण्यात आले. हे गीत जाखडी लोककलेवर आधारित आहे. प्रितेश मांजलकर यांचे गीत व संगीत असून संगीत संयोजन अक्षय धांगट यांचे, प्रवीण डोणे यांनी गायले आहे.
भोवनी हा चित्रपट सर्वार्थाने कोकणात तयार झालेला असा पहिला वहिला चित्रपट आहे. काही तांत्रिक बाजू वगळता चित्रपट निर्मितीचे सर्व काम कोकणातच झाले आहे. कोकणच्या अस्सल मातीत घडलेल्या गाण्याचा वारू जगभरात उधळू दे, असे आवाहन चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप शिवगण आणि अजित खाडे यांनी केले. कार्यक्रमाला अभय खेडेकर, अनुष्का खेडेकर, दत्ताराम गोताड, आप्पा घाणेकर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
www.konkantoday.com