
महिलांनी राज्य महिला आयोगाकडे गेलेल्या तक्रारीनंतर शिक्षण विस्तार अधिकारी सुनील पाटील निलंबित.
रत्नागिरीतील महिलांनी राज्य महिला आयोगाकडे गेलेल्या तक्रारीनंतर शुक्रवारी संबंधित रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी सुनील पाटील याला निलंबित करण्यात आले. कामाच्या ठिकाणी असभ्य वर्तन करून महिलांना नाहक त्रास दिल्याबद्दल जिल्हा परिषदेमधील एक महिला शिक्षिका आणि नगरपालिकेतील महिला शिक्षिकेने राज्य महिला आयोगासमोर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चौकशीअंती निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीमध्ये महिला आणि बालविकास विभागाकडून आयोजित महिला आपल्या दारी या मोहिमेत उपस्थित राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना प्रत्यक्ष भेटून महिलांनी आपली व्यथा मांडली होती. या तक्रारींची त्वरित दखल घेत चाकणकर यांनी या अधिकार्याची चौकशी करण्याच्या सूचना करून कारवाई करावी आणि यासंदर्भातील अहवाल अधिकार्यांना सादर करावा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांना दिले होते.www.konkantoday.com