
खादी ग्रामोद्योगने बनविला गायीच्या शेणापासून साबण
आता आपण टीव्हीवर वेगवेगळ्या सुगंधित साबणाच्या जाहिराती पाहात आलाेहोताे त्याचा वापरही करीत आहाेत परंतु आता जनतेला गाईच्या शेणापासून बनवलेला नैसर्गिक साबण वापरता येणार आहे. आता गाईच्या शेणापासून हा साबण खादी ग्रामोद्योग विभागानं बनवलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हा साबण लाँच केला आहे.
गाईच्या शेणापासून बनवलेला साबण १२५ रुपयांना मिळणार आहे. विशेष म्हणजे हा साबणाचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही असा दावा खादी ग्रामोद्योगने केला आहे
www.konkantoday.com