
आ. शेखर निकम भरवणार आता दर सोमवारी जनता दरबार
चिपळूण शहर परिसरातील नागरिकांच्या समस्यांबाबत तसेच नागरिकांना भेटता यावे यासाठी चिपळूणचे आमदार शेखर निकम हे दर सोमवारी चिपळूण शहरातील त्यांच्या संपर्क कार्यालयात सकाळी १० ते दु. २ या वेळात जनता दरबार भरवणार आहेत. यामध्ये नागरिकांच्या काही समस्या असतील तर ते त्या ठिकाणी येवून आमदारांसमोर समस्या व गार्हाणे मांडू शकतील. १ ऑगस्टपासून जनता दरबाराचा हा उपक्रम सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर प्रमुख मिलिंद कापडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुचयअण्णा रेडीज, शिरीष काटकर, सतिश खेडेकर आदीजण उपस्थित होते.
www.konkantoday.com