जुनी पेन्शन संघटने तर्फे सत्कार व स्वागत मेळाव्याचे आयोजन शिक्षणसेवक पद रद्द करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना कटिबध्द – जिल्हाध्यक्ष अंकुश चांगण यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा रत्नागिरीच्या वतीने जिल्हा परिषद रत्नागिरीचा जिल्हास्तरीय सन 2023- 24 चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले श्री. माधव अंकलगे सरांचा प्रथम सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. अंकलगे सरांनी सर्वच नवनियुक्त शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सेट परीक्षा उत्तीर्ण पेन्शन फायटर श्री. पुंडलिक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. ऑगस्ट 2024 मध्ये पवित्र पोर्टल टप्पा 2 मधून रत्नागिरी तालुक्यात नियुक्त झालेल्या सर्व नवनियुक्त शिक्षकांचे संघटनेकडून गुलाब पुष्प व छोटीशी भेट वस्तू देऊन स्वागत करण्यात आले.

सर्वांनी स्वतःचा परिचय देऊन संघटनेने आपल्याला हजर होण्यापासून वेळोवेळी केलेल्या मदतीसाठी व हा स्वागत मेळावा आयोजित केल्याबद्दल संघटनेप्रती कृतज्ञता व्यक्त केली तसेच शिक्षण सेवक पद कार्यमस्वरूपी रद्द करण्यात यावे यासाठी संघटनेने राज्यस्तरावर प्रयत्न करावेत अशी सर्वांच्यावतीने मागणी करण्यात आली. त्याचबरोबर रत्नागिरी तालुक्यातुन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा रत्नागिरीच्या तालुका कार्यकारिणीत रिक्त पदी तालुका सल्लागार श्री. माधव अंकलगे सर, तालुका सरचिटणीस श्री. अवधूत शिंदे , तालुका उपाध्यक्ष श्री. सुजित वाफेलकर , तालुका सहसचिव श्री. पंकज शिंदे,तालुका संघटक श्री. मनोहर इनामे,तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री. रामदास चव्हाण व श्री. प्रमोद पाटील,तालुका महिला संघटक स्नेहा ठाकरे या सर्व पेन्शन फायटर्सची सर्वानुमते निवड करण्यात आली.

निवड केलेल्या सर्व तालुका कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी निरीक्षक म्हणून रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे विद्यमान संचालक तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.अंकुश चांगण उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात शिक्षणसेवक पद रद्द करण्यासाठी आपली संघटना कटिबध्द असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा सरचिटणीस श्री. दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा सह सरचिटणीस श्री. महादेव बंडगर , जिल्हा महिला आघाडी प्रतिनिधी श्रीम. मंजिरी डेरे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री. राहुल अलकटवार, तालुका कार्याध्यक्ष श्री. तुकाराम मुरकुटे, तालुका कोषाध्यक्ष श्री. रामनाथ बने, तालुका महिला आघाडी प्रमुख सौ. वृषाली हेळेकर, तालुका महिला आघाडी प्रतिनिधी सौ. अक्षत सायगावकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री. महेंद्र ढाकणे, तालुका सह सरचिटणीस श्री. गणपती पडुळे, शिरगाव बीट प्रमुख श्री. मोसीन आतार, श्री. संतोष ढोले, श्री. सत्यवान गायके व सर्व नवनियुक्त शिक्षक व तालुक्यातील पेन्शन फायटर्स उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. रामदास चव्हाण यांनी केले असून तालुकाध्यक्ष राहुल अलकटवार यांच्यावतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button