
शासनाच्या योजना शुभारंभ प्रसंगी महायुतीत आपआपसात आरोप प्रत्यारोप
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या गुरूवारी राजापूर तालुक्याच्या झालेल्या शुभारंभ कार्यक्रमात पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी उबाठा गटातील आमदार राजन साळवी यांच्या अप्रत्य टीकेची झोड उठवली होती. मात्र त्याला काही तासांचा अवधी लोटतो न लोटतो, तोच राज्यातील महायुतीच्या सत्तेतील भागीदार पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेश सरचिटणीस व संघातल आगामी विधानसभा निवडणुकीतील इच्छूक उमेदवार अजित यशवंतराव यांनी ना. सामंत यांच्यावर टीकेची गोफळ भिरकावली आहे. याबाबत त्यानी ट्वीटही करून खळबळ उडवून दिली आहे.राज्यात सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत हे जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ करताना व अंमलबजावणी करताना आम्हा सत्तेतील सहयोगी पक्षांना विश्वासात न घेता मनमानी करत आहेत, असा आरोप श्री. यशवंतराव यांनी केला आहे. गुरूवारी लांजा व राजापूर तालुक्यात या योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात महायुतीतील सहयोगी पक्षांना ना. सामंत यांनी डावलल्याचा आरोप करीत राज्यात महायुतीचे सरकार आहे आणि या महायुतीमुळे ते राज्यात मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, याचा त्यांना विसर पडल्याची टीका यशवंतराव यांनी केली आहे. www.konkantoday.com