ना.नितेश राणे यांचे राजापुरात महायुतीच्या वतीने जंगी स्वागत
राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री पदाचा शपथ घेतल्यानंतर प्रथमच कोकणात राजापूर रानतळे येथील हॅलिपॅडवर दाखल झालेल्या राज्याचे बंदर व मत्स्य विकास मंत्री ना.नितेश राणे यांचे राजापुरात महायुतीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. ना. राणे यांच्या स्वागतासाठी भाजपा महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांनीही हजेरी लावली होती.मुंबईरून हॅलिकॉप्टरने राजापूरात रानतळे येथील हॅलिपॅडवर दाखल झालेल्या ना. राणे यांचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना. नितेश राणे हॅलिपॅडवर उतरताच नितेशजी राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणांनी सारा परिरसर दणाणून सोडला.
रविवारी प्रथमच ना. राणे हे कोकण दौऱ्यावर आले आहेत. रविवारी सकाळी १० वाजता रानतळे येथील हॅलिपॅडवर दाखल झाले. यावेळी त्यांचे राजापूर, लांजा साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी स्वागत केले. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार दीपाली पंडीत व पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांसह भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आधी जण जण उपस्थित होते