चिपळूण तालुका आदिवासी आदिम सेवा व रोजगार सहकारी संस्थेच्यावतीन कातकरी वीटभट्टी प्रकल्पातून रोजगार निर्मिती
. चिपळूण तालुका आदिवासी आदिम सेवा व रोजगार सहकारी संस्थेच्यावतीने चिंचघरी येथे नव्याने वीटभट्टी प्रकल्प सुरू केला असून यातून समाजबांधवांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे. याकरिता शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांनी आर्थिक सहाय्य केले आहे. या प्रकल्पामुळे या समाजबांधवांची स्थलांतरित जीवन जगण्याची पद्धत थोडीफार कमी होवू शकणार आहे.आदिवासी कातकरी समाज विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी आदिवासी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे जिल्हा सचिव व तालुका संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्यासह सहकारी प्रयत्नशील आहेत. यातून जाधव यांनी समाजातील युवकांशी चर्चा करून रोजगार निर्मितीसाठी काहीतरी साधन असावे यासाठी चिपळूण तालुका आदिवासी आदिम सेवा व रोजगार सहकारी संस्थेची स्थापना केली.
संस्थेची स्थापना केल्यानंतर संस्थेने आपल्या समाजातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी वीट प्रकल्प सुरू करण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले आणि ते आता प्रत्यक्षात येत आहे. या वीटभट्टी प्रकल्पाचे उदघाटन चिंचघरी येथे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा ग्रामीण चिपळूणचे अध्यक्ष, पत्रकार संतोष कुळे यांच्या हस्ते करण्यात आले.www.konkantoday.com