
राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षाचे फोटो बॅनरवर नसल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी बैठकीत वादाची ठिणगी
चिपळूण येथील ब्राह्मण सहाय्यक संघ, सभागृहात शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या बैठकीत व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण यांचा फोटो नसल्याने वादाची ठिणगी पडली. मात्र माजी आमदार रमश कदम यांनी वरिष्ठांसमोर अशा प्रकारचा वाद घालणे आपली संस्कृती नसल्याचे सांगत हा वाद दुर्लक्षित करतानाच वाद घालणार्यांनाही फटकारले.
जिल्हा राष्ट्रवादीची कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्यावतीने जिल्ह्याती प्रमुख पदाधिकार्यांची आढावा बैठक माजी सहकार मंत्री व जिल्हा निरीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत येथे पार पडली. या बैठकीत लावण्यात आलेल्या बॅनरवर जिल्ह्यातील नेत्यांचे फोटो असताना महिला जिल्हाध्यक्षांचा फोटो नसल्याने यातून बैठकीच्या प्रारंभी वादाची ठिणगी पडली. यावेळी महिलांवर अन्याय का? याचे उत्तर देण्याची मागणी करण्यात आली. संताप अनावर झालेल्या महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण यांनी व्यासपीठावरूनच आढावा बैठकीच्या बॅनरवर जिल्हा महिलाध्यक्ष म्हणून आपला फोटो नसल्याने निश्तिचच आपल्यावर अन्याय केल्याचा मुद्दा मांडताच यावरून उपस्थित महिलादेखील संतापल्या. अखेर आयोजकांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पदनियुक्ती कार्यक्रम सुरू करत बॅनरवरचा फोटो विषय मागे टाकला.
www.konkantoday.com




