
सध्या मच्छराच्या मदतीला पेंग्विनही आला आहे-मंत्री नितेश राणे.
मच्छर मारायला गुड नाइटचे कॉइल लावावे लागतात. त्यासाठी कुणाला रेकी करायची गरज नाही,’ असा टोला मंत्री नितेश राणे यांनी आज (शनिवार) विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावला.संजय राऊत यांच्या घराची दोन जणांनी रेकी केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शुक्रवारी केली.
या पार्श्वभूमीवर बोलताना नितेश राणे म्हणाले,’खिचडीचोर नेमका कुठे राहतो, खिचडी कुठे डिलीव्हर करायची आहे हे पाहण्यासाठी ते लोक आले असावेत. कारण संजय राऊत यांना महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे महत्त्व नाही. त्यांचे राजकीय महत्त्व जनतेने संपविले आहे. अशा मच्छरांना मारण्यासाठी आम्ही गुड नाइटचे कॉल लावून टाकू, ते आपोआप पळून जातील. सध्या मच्छराच्या मदतीला पेंग्विनही आला आहे फार गांभीर्याने घेऊ नका असा टोला आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.