
संगणक परिचालक मानधन न देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई कराः समविचारी मंचची मागणी
रत्नागिरीः आपले सरकार सेवा केंद्रातील ५५० संगणक परिचालकांना गेले ५ महिने मानधन देण्यात आलेले नाही.ही बाब संतापजनक असून या प्रकरणी सबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई करावी लागेल असा इशारा महाराष्ट्र समविचारी मंचने दिला आहे.
याबाबत समविचारीचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी सांगितले की,मक्ता घेतलेली कंपनी ही याला जबाबदार आहे.जिल्हापरिषद ग्रामीण विभागाला याबाबतीत माहिती नाही.तरीही जिल्ह्यातील ८४५ ग्रामपंचायतींमधील ५५० संगणक परिचालकांना मानधन न मिळाल्याचे सांगितले जात आहे.एकच कंपनी नेमल्याने हे मानधन थटले आहे.याप्रश्नी या परिचालकांसमवेत समविचारी असून याबाबतीत आवश्यक तो पत्रव्यवहार सुरु आहे असेही पुनसकर यांनी स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com