
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परुळेकर यांचे निधन.
कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा’ संस्थेच्या संचालिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परुळेकर (वय ७४) यांचे (दि.२६) दुपारी ३ वाजता निधन झाले. त्या गेली काही वर्षे आजारी होत्या.दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गुरुवारी (दि. २७) पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काम सुरू केले होते. महिला सबलीकरणासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी रोजगार प्रशिक्षण, उद्योग मेळावे घेतले. महिला सबलीकरणाची चळवळ गेली ३३ वर्षे त्यांनी अखंडपणे सुरू ठेवली होती.