मुरूडमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू.
दापोली तालुक्यातील मुरूड येथे कराड येथून पर्यटनासाठी आलेल्या शशिकांत नारायण कांबळे (शनिवार पेठ, पाटण कॉलनी) या ५० वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ८.३० वा. घडली.शशिकांत कांबळे हे त्यांचे मित्र संजय अहिवळे, अल्ताफ खान, अमित मोरे, अजिंक्य पवार, किरण पांढरपट्टे यांच्यासमवेत १६ डिसेंबर रोजी पर्यटनासाठी दापोली येथील मुरूड येथे आले. संध्याकाळी आल्यानंतर सर्वजण मुरूड येथील रॉयल सी या हॉटेलमध्ये राहण्यासाठी थांबले होते.www.konkantoday.com