
पुलोत्सवच्या रंगमंचावर निरूपण हे अत्यंत दर्जेदार नाटक दि. 10 रोजी पुलोत्सवाच्या समारोपाला सादर होणार
आर्ट सर्कल आणि आशय सांस्कृतिक यांच्या संयुक्त सहकार्याने होणाऱ्या पुलोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी 10 तारखेला सायंकाळी 7 वाजता सादर होणारा कलांश निर्मित बिराड हा दीर्घांक काही अपरिहार्य तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आला आहे. परंतु त्याऐवजी *रंगपंढरी* निर्मित आणि *ईश्वर अंधारे* लिखित दिग्दर्शित *निरूपण* हे संगीत नाटक होणार आहे. अत्यंत दर्जेदार आणि तगडी संहिता असलेलं आणि रसाळ मधुर गीते असलेलं हे नाटक *आयपार इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल* या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवामध्ये सादर होणार आहे.
नाटक हा रत्नागिरीकरांच्या जिव्हाळ्याचा विषय! आणि त्यातही संगीत नाटक म्हणजे काळजाचाच तुकडा!
रसिकांनी आस्वाद घ्यावा.असे आवाहन आयोजकांनी केले आहे .
www.konkantoday.com