हर्णै येथे मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्याहर्णैसाठी आणलेले सुमारे ३० हजार लिटर डीझेल सदृश्य द्रवपदार्थ नौकेसह जप्त.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख मासेमारी बंदर म्हणून ओळखल्या जाणार्या हर्णै बंदरामधून दापोली पोलिसांनी एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणलेले सुमारे ३० हजार लिटर डीझेल सदृश्य द्रवपदार्थ या नौकेसह जप्त केले असून त्यांची किंमत सुमारे ४७ लाख ६२ हजार ५०० रुपये असल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली आहेहर्णै बंदर येथे एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी डीझेल सदृश्य द्रवपदार्थ आणला असल्याची माहिती दापोली पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी काल (ता.१५ ) रोजी सायंकाळी ५ वाजता हर्णै बंदर येथे आपल्या पथकासह धाव घेतली. तेथे त्यांना सुफी नाव असलेल्या व एमएच ७ एमएमएम २८८ हा क्रमांक असलेली मासेमारी नौका तेथे आढळून आली, या नौकेची तपासणी केली असता नौकेच्या १४ खणांमध्ये सुमारे ३० हजार लिटर डीझेल सदृश्य द्रवपदार्थ आढळून आला.
याच नौकेवर हा द्रवपदार्थ काढण्यासाठी एक सक्शन पंपही आढळून आला. या प्रकरणी संशयित वामन पोशिराम रघुवीर, (वय ३७)रा. हर्णै, हातीन केसरीनाथ कोळी (वय ३४) व दर्शन अनंत कोळी, (वय ३५) दोन्ही रा. बोडणी, रेवस ता. अलिबाग, संदीपकुमार मिठाईलाल मिसाद, (वय ३२) व शिव्य प्रमोद मिसाद (वय १९) रा. झापराबाद, जोनपूर (उत्तर प्रदेश) यांचेविरोधात विनापरवाना डीझेल सारख्या जीवनावश्यक व ज्वालाग्राही पदार्थाची कोणतीही योग्य ती खबरदारीन घेता मानवी जीवितास धोका उत्पन्न होईल अशा रीतीने हाताळणी, साठवणूक व वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.