
संगमेश्वर तालुक्याच्या ग्रामीण भागात अनधिकृतरित्या पेट्रोलची विक्री
संगमेश्वर तालुक्याच्या ग्रामीण भागात अनधिकृतपणे पेट्रोलची चढ्या दराने विक्री केली जात आहे. पानपट्ट्या, किराणा मालाचे दुकान, कोल्ड्रींक्स आदी ठिकाणी पेट्रोलची अनधिकृतरित्या विकि होत आहे.ग्रामीण भागात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमात वाढली आहे. याचा फायदा घेवून अनधिकृतपणे चढ्या दराने पेट्रोलविक्री करणार्यांची संख्या देखील वाढली आहे.
पानपट्टीसह अन्य दुकान मालकांकडून पेट्रोलचा साठा करून ठेवला जात आहे. प्रतिलिटरमागे १५ ते २० रुपये जादा आकारून गरजूंना पेट्रोल वितरित केले जाते. रस्त्यात पेट्रोल संपल्यास, जवळपास पेट्रोलपंप नसल्याने वाहन चालकांना नाईलाजाने जादा दराने पेट्रोल खरेदी करावे लागत आहे. www.konkantoday.com