
कचरा संकलनासाठी गुहागरला ८ घंटागाड्यांसाठी गुहागरला निधी मिळाला.
गुहागर शहरांमध्ये कचरा साचू नये, यासाठी संकलन व प्रक्रियायावर भर दिला जातो. त्याच धर्तीवर ग्रामीण भागामध्येही ओला व सुका कचरागोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरी सुविधाघटक योजनेमधून गुहागर तालुक्याला एकूण ८ घंटागाड्या मंजूर झाल्या असून यामध्ये वेलदूर, अंजनवेल, पाटपन्हाळे, पालशेत, अडूर, वेळणेश्वर, पडवे, कोतळूक या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती गुहागर पंचायतसमितीकडून देण्यात आली. यासाठी जिल्हा नियोजनमधून ९० टक्के अनुदान देण्यात आले आहे.www.konkantoday.com