शाळेच्या ट्रिपला मोडक्यां नादुरुस्त बसेस, फलटणचे विद्यार्थी रत्नागिरीत अडकले!
फलटण तालुक्यातील राजाळे येथील श्री जानाई हायस्कुलच्या विद्यार्थी हे वार्षिक सहलीसाठी गणपतीपुळे, रत्नागिरी येथे गेले होते. तर जाताना सातारा जिल्ह्यातील औंध येथे पहिल्यांदा बस बंद पडली त्यानंतर रत्नागिरी येथे बस बंद पडली होती. त्यामुळे संपूर्ण सहलीचे वेळापत्रकच कोलमडले होते. त्यामुळे पालक सुद्धा चिंतेत पडले होती कि; आपले पाल्य हे एवढ्या लांब अडकून पडलेसध्या शालेय सहलींचा हंगाम सुरू आहे. सहल म्हणजे शालेय मुलांना आनंद व विविध अनुभव देणारे साधन असते.
श्रीमंतांची मुले त्यांच्या खासगी गाडीने कुठेही जाऊ शकतात पण गोरगरीब व सामान्य माणसाच्या मुलांना अल्प खर्चात फिरण्याचा आनंद मिळतो तो शालेय सहलीत. विविध गड किल्ले, समुद्र किनारे, लेण्या, विविध मंदिरे, प्राचीन इतिहास या सहलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना अनुभवता येतो. या साठी शासकीय सर्व परवानग्या, विद्यार्थी विमा, पॉलिसी हे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी शिक्षक धडपडत असतात जेणे करून सहलीचा आनंद मुलांना घेता यावा; हे सर्व करून सुद्धा जर सहलीच्या ठिकाणी गेल्यावर बस बंद पडत असतील तर याला नक्की कोण जबाबदार ? ज्या बस लांब जाऊ शकत नाहीत; त्याबसेसना लांब का पाठवले जाते ? असे प्रश्न सुद्धा उपस्थित राहत आहेत.शासन सहल शासकीय वाहनाने म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसनेच नेण्यात यावी; यासाठी आग्रही असते.
शासनाचे हे धोरण बरोबरच आहे. पण या सहलीसाठी दिल्या जाणाऱ्या एसटी बस गाड्या ह्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या दिल्या जातात. त्या बसला धड काचा, खिडक्या, नीट नसतात. इंजिन मध्ये बिघाड असतो, घाट चढताना जीव मुठीत घेऊन विद्यार्थी व शिक्षक प्रवास करत असतात. गाडी बंद पडून तासन तासवाया जातात. त्यामुळं नियोजित ठिकाणे विद्यार्थ्यांना बघता येत नाहीत. इतर वेळी थोडा उशीर झाला तर एसटीचे अधिकारी शाळांना दंड लावतात. मग एसटीच्या चुकीमुळे सहलीचे नियोजन फसले तर याला जबाबदार कोण ? अशावेळी अधिकारी उडवा – उडवीची उत्तर देतात; आणि हाच अनुभव राजाळे येथील श्री जानाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राजाळेचे सहलीच्या निमित्ताने आला